चुल्हाड येथे सर्पमित्रांनी दिले नाग प्रजातीच्या सापाला जीवनदान

0
22
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे विजय अंबुले यांच्या गोठ्यात भला मोठा साप दिसला दरम्यान सापाला पाहताच कुटुंबीयांत एकच खळबळ उडाली. यावेळी गोठ्यात साप असल्याची माहिती गावातीलच सर्पमित्र यांना देण्यात आली. यावेळी सर्पमित्र शुभम तुमसरे, लक्ष्मण खडसन, कार्तिक राणे यांनी घटनास्थळ गाठून त्या सापाला मोठ्या शिताफीने पकडून त्याला प्लास्टिक डब्यात जेरबंद केले. सदर साप हा विषारी नागप्रजातीचा असून त्याची लांबी 6 फूट असल्याची माहिती सर्पमित्रांना दिली. साप विषारी असो की बिनविषारी हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असून या सापाला मारू नका तर सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांशी संपर्क करावे असे आवाहन देखील सर्पमित्र शुभम तुमसरे यांनी केले. यावेळी त्या नाग प्रजातीच्या सापाला चांदपूर येथील संरक्षित जंगलात सोडून जीवनदान देण्यात आले.