जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
दिनांक 27 एप्रिल ते 1 मे पर्यंत असलेल्या 6 दिवशीय मोफत बालसंस्कार शिबिराची सुरुवात झाली असून यात प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबतच तायक्वांडो, जुडो यासारख्या पाश्चात्त्य खेळांचा समावेश करण्यात आला आहे. मुला मुलींना त्यांच्या स्वयंसंरक्षणार्थ विविध कला अवगत व्हाव्यात दांडपट्टा, लाठ्या काठय़ा, तलवारबाजी यासारख्या शारीरिक विकासात्मक शिवकालीन कलांची जाण व्हावी तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध क्रिडा प्रकारांची माहिती अशा एक ना अनेक उद्देशातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाठी-काठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा एक प्राचीन मर्दानी खेळ. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे यातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला.
“मन, मेंदू आणि मनगट यांच्यामध्ये साहस निर्माण करण्याचे असेल तर मुला-मुलींनी मैदानात उतरलेच पाहिजे. शिवकालीन शस्त्रास्त्र खेळाचे प्रशिक्षण आपल्या मुलांना नेहमीच स्व-रक्षणासाठी महत्वपूर्ण आहेत असे मार्गदर्शन छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितिन धांडे यांनी केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. दिलीपभाऊ सार्वे उपस्थिती होते, मार्गदर्शक उपासरवजी सोनवाणे, आकाशजी सोनवाणे, बंटीभाऊ लील्हारे अध्यक्ष राजे प्रतिष्ठान देव्हाडी, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे सचिव अमोल उमरकर, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, अंकुश गभणे, प्रज्वल बुधे, मयुर पुडके, गीतेश गानोरकर, मनीष गायधने, हौसिलालजी ठाकरे, संकेत बुधे, युवणेश धांडे, खुशी भोयर, पूजा सिंगंजुडे उपस्थित होते.
परिसरातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिबिरात सहभागी होऊन सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान करीत आहे
Home आपला विदर्भ छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण व...