तुमसर तालुक्यातील गोंडीटोला गावाची स्मार्ट गावाकडे वाटचाल सुरू… सरपंच शितल चिंचखेडे यांचा स्तुत्य उपक्रम…

0
60

जिल्हा प्रतिनिधी/सतीश पटले 

तुमसर तालुक्यातील गोंडीटोला गावाची १५ जानेवारीला सरपंच पदाची धुरा सांभाळणाऱ्या शितल चिंचखेडे यांनी अवघा अडीच महिन्यात गावाचा चेहरामोहरा बद्दलविण्याचा सराहनिय उपक्रम सुरू केला आहे. गावातील शाळा, सभागृह, ग्रामपंचायत इमारत, प्रवेशद्वाराला रंगरंगोटी केली आहे. इतकेच नाही तर प्रवेशद्वाराला लावण्यात आलेली रंगबिरंगी सीरींज आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. शाळेच्या आवार भिंतीवर बोलके चित्र काढणार असल्याची माहिती सरपंच शितल चिंचखेडे यांनी दिली आहे.दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावांत सरपंच पदावर शितल चिंचखेडे यांची नियुक्ती होताच १ ली ४ थी पर्यंत एकच शिक्षक कार्यरत होते. ३० विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता त्यांनी सरपंच मानधनातून १ शिक्षिका नियुक्त केली आहे. सरपंच मानधनातून गावात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ कर्तृत्ववान नागरिकांना सन्मानित करणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान गत अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या शाळा, प्रवेशद्वार, ग्रामपंचायत इमारत, सभागृह या इमारतीचा रंगरंगोटीतून कायापालट करण्यात आलेला आहे. प्रवेशद्वाराला आणि मार्गाचे कडेला रंगबिरंगी सिरिज लावण्याचा निर्णय घेतला आहे. दर दिवशी गावात दिवाळी सण असल्याचा अनुभव गावकऱ्यांना आलेला आहे. गावात नळ योजनेतून गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १२५ नळ कनेक्शन धारक असून थकबाकीचा वाढता आकडा असल्याने पाणीपट्टी करात सूट दिली आहे. २०२४-२५ या कालावधीत फक्त एक वर्षासाठी नळ कनेक्शन धारकांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. गावातील मुख्य चौक, मार्ग व गल्ली वार्डाना गावांतीलच पूर्वजांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे. गावात ३३ मुख्य चौक आणि मार्गाना पूर्वजांचे नावे दिले जाणार आहेत. अल्पावधीतच गावात विकास कामे पूर्ण करण्यांचा त्यांच्या धाडसी निर्णयाची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. त्यांचे कार्याची दखल घेत युगांधार युवा आणि क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांना उत्कृष्ट महिला सन्मान देण्यात आलेला आहे. घनकचरा, शुद्ध पाणी, रस्ते, केरकचरा विल्हेवाट, शिक्षण आणि आरोग्य या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गोंडीटोला भूषण अवार्डची घोषणा पहिल्यांदाच गावात करण्यात आली आहे. गावांत तमुसच्या सभा आयोजित करण्यासाठी सभागृह आहे. या सभागृहाचे नावात बदल करीत न्यायदान कक्ष असे नाव देण्यात येणार आहे. या सभागृहात न्यायालयातील प्रतिकृती निर्माण करण्यात येणार आहे. ही प्रतिकृती आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार आणि डिजिटल अंगणवाडी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.सरपंच चषक क्रिकेट प्रतियोगीतेची सुरुवात त्यांनी केली आहे. सरपंच आपल्या दरी उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली असून नागरिकांच्या दारातच समस्या ऐकल्या जात आहेत. एक गाव एक रोजनदारी दर निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच मानधनातून दिले जाणारे पुरस्कार :- महानत्यागी बाबा जुमदेवजी व्यसनमुक्ती पुरस्कार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर युवारत्न पुरस्कार, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा नागरी सन्मान, संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार, सावित्रीबाई फुले लेक लाडकी सन्मान, सरपंच शितल चिंचखेडे महिला नागरी सन्मान,, गुरुवर्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमलाल उरकुडे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, स्व रामदयाल राहगडाले माजी सरपंच समाजरत्न पुरस्कार, सहकार महर्षी होलन राहगडाले आजी आजोबा सत्कार, गुण गौरव सन्मान, व अन्य ९ असे ३१ नागरिकांचे सन्मान करण्यात येणार आहेत.गावांचे विकास कार्यात गावकऱ्यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरत आहे. १ मे रोजी कर्तृत्ववान नागरिकांचे सरपंच मानधनातून सन्मान करण्यात येणार आहे. या आधी गावातील लेकींना सासरी जातांना माहेर भेट सुरू केली आहे. स्मार्ट गावाची संकल्पना पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.