पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे हे समाजाचे प्राथमिक दायित्व – जयश्री पुंडकर

0
5
1

गोंदिया/धनराज भगत

जिल्ह्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत गोठणपार येथे लग्न समारंभातून बेपत्ता झालेल्या बारा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून तिचे दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली होती. या अमानवीय घटनेचा सहा दिवस लोटूनही सुगावा लागत नव्हता व आरोपीचे शोध लागत नव्हते, त्यामुळे समाजात पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. आरोपी पकडण्यात यावे यासाठी निवेदने दिली जात होती. पोलीस विभागाला धारेवर धरण्यात येत होते. ही सर्व घटना बघता व त्यावर गांभीर्याने विचार केल्यास एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की, निवेदने व कँडल मार्च च्या ऐवजी घटनेच्या सुगावा (clue) लावण्यासाठी परिसरातील लोकांनी, नातेवाईकांनी व सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनाला मदत करणे प्राथमिक दायित्व आहे. कारण गुन्हेगाराच्या शोध लावण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
          तथापि पोलीस प्रशासनाने पोलीस विभागातील 40 लोकांच्या यंत्रणेने या घटनेच्या आरोपी शोधण्यात अहोरात्र परिश्रम केले, व आरोपी पकडण्यात यश मिळविले.पोलीस अधीक्षक,मा.निखिल पिंगळे , यांच्या मार्गदर्शनात, अप्पर पोलीस अधीक्षक देवरी नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी मा.विजय पाटील  आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेप्रती जिल्ह्यातील नागरिक व महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करीत आहे.