तुमसर शहरात विविध ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे पाणी प्याऊचे उद्घाटन

0
41

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तुमसर येथे दरवर्षी उन्हाळ्यात तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर असतो. दरम्यान तालुक्यातील व शहरातील प्रवासी आपल्या कामानिमित्त तुमसरला ये -जा करतात. यात जुना बस स्टॉप व नवीन बस स्टॉप या भागात भरपूर नागरिकांचे आवागमन असते. उन्हामुळे नागरिकांना पाण्याचा त्रास होऊ नये व भर उन्हाळ्यात नागरिकांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमसर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे शहराच्या मध्यभागी जुना बस स्टॉप व तसेच नवीन बस स्टॉप समोर पाणी प्याऊ सुरू करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इंजि.सागर गभने,नरेश मोटघरे,फिरोज शेख, अनुप तिडके, संकेत गजबिये,राहुल रणदिवे,अर्पित खानोरकर,आकाश तिडके,जुबेर शेख,बालेश्वर लांजेवार मनीष बोंद्रे,नितेश बडवाईक,सोमेश्वर लांजेवार,आयुष बडवाईक,अमोल गुरवे,यश बडवाईक,अनमोल कावडे,अनुज तिडके,भावेश पाल,हर्शल चौधरी उपस्थित होते.

Previous articleपोलीस प्रशासनाला सहकार्य करणे हे समाजाचे प्राथमिक दायित्व – जयश्री पुंडकर
Next articleकुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा उद्या