कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा उद्या

0
4
1

गोंदिया / धनराज भगत

कुणबी समाज सेवा समिती आमगाव तर्फे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह उद्या दिनांक १ मे २०२४ बुधवार ला सायंकाळी ७.३० वाजता “संत तुकाराम महाराज कुणबी समाज भवन” येथे संपन्न होईल.
मागील ४६ वर्षापासून आमगाव येथे कुणबी समाजाचे सामूहिक विवाह होत आहेत. समाजाचा वेळ, पैसा व श्रम वाचविण्यासाठी सामूहिक विवाह संपन्न केले जाते.
या सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येत समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाज सामूहिक विवाह समिती तर्फे करण्यात आले आहे.