महाराष्ट्र दिन व अक्षय तृतीया निमीत्त बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार

0
70

  गोंदिया / धनराज भगत

महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना 19 जानेवारी 2024 नुसार 1 मे महाराष्ट्र दिन निमीत्त सार्वजनिक सुट्टी व जिल्हाधिकारी गोंदिया यांचे 18 डिसेंबर 2023 चे आदेशानुसार 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया निमीत्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदर सार्वजनिक व स्थानिक सुट्टी लक्षात घेता आरोग्य संस्थेअंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभाग बुधवार दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त बंद राहील तसेच शुक्रवार 10 मे रोजी अक्षय तृतीया निमीत्ताने बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांनी कळविले आहे.

Previous articleपालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next articleसोंड्या येथे अवैध हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड