प्रतिनिधी – अभीजीत कोलपाकवार
आष्टी: पोलिसांनी १ मे रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.पोलीस अधिक्षक गडचिरोल निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली (अभियान) यतीश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) कुमार चिंता,अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी एम रमेश, यांचे प्रेरणेने व उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अजय कोकाटे,यांच्या मार्गदर्शनात, दिनांक ०१/०५/२०२४ रोजी महाराष्ट्र दिना निमित्य सकाळी ०७:१५ वा. झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक विशाल प्र. काळे यांच्या संकल्पनेतून सकाळी १०:०० वा. गडचिरोली पोलीस दला अंतर्गत ०१ मे २०१९ रोजी जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटात पंधरा जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ पोलीस स्टेशन आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून पोस्टे आष्टी हद्दीतील समाविष्ट असलेल्या गावांमध्ये स्वतःहा जाऊन नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा असे आव्हान केले. सदर रक्तदान शिबिरा मध्ये नागरिकांनी स्वतःहा सहभाग घेऊन पोलीस स्टेशन आष्टी येथे रक्तदान करून ०१ मे २०१९ रोजी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरामध्ये एकूण- ५२ नागरिकांनी तसेच पोलीस स्टेशन आष्टी येथील अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशन आष्टी येथील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वृंद हजर होते.