देवळी तालुका क्रीडा संकुल मध्ये महाराष्ट्र दिन साजरा…….

0
118
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : गजानन पोटदुखे

दिनांक :- 1 मे 2024

आज दिनांक 1 मे ला देवळी तालुका क्रीडा संकुल मध्ये महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या औचित्य साधत आज ध्वजारोहण करण्यात आले. 1

मे हा दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची आठवण म्हणून हा दिवस 1960 पासून मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा संमत करण्यात आला होता. त्यानंतर भाषिक ओळींवर आधारित राज्यांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी संजय कथलकर, क्रीडा मार्गदर्शक सुरेंद्र गांडोले, लिपिक अर्चना नाईक, व इतर खेळाडू नागरिक यांची उपस्थिती होती.