धक्कादायक! वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू.. रोहा येथील घटना

0
5
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

मोहाडीतालुक्यातील रोहा येथे वैनगंगा नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 30 एप्रिल रोजी घडली. सविस्तर वृत्त असे की, बादल राधेश्याम आंबागडे वय 18 वर्षे, रा. कुशारी, ता. मोहाडी असे मृतक तरुणाचे नाव असून हा आपल्या नातेवाईक व मित्रांसोबत रोहा येथील वैनगंगा नदी पात्रात आंघोळीसाठी गेला असता नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या पाय खोल पाण्यात घसरला यातच बादल आंबागडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी मृतकाला मोहाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग मोहाडी पोलिसात दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भुरे करीत आहेत.