ग्रामपंचायत मोहाडी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

0
2
1

प्रतिनिधि/पंकज रहांगडाले

गोरेगाव : तालुक्यातील ग्रांम पंचायत मोहाडी येथे आज दिनांक ०१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायतचे उपसरपंच मोहनलाल पटले तर ध्वजारोहक ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य भिवराज शेंन्डे, योगराज भोयर, खेमराज वाकले, पुस्तकला पटले, प्रभा पंधरे, पुजा डोहळे, तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, पोलिस पाटील राजेश येळे, सेवानिवृत्त पोस्टमास्तर हिरालाल महाजन, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए के वंजारी,आशा सेविका ललिता कावळे, योगेश्वरी पटले, अंगणवाडी सेविका मंगलाताई चौव्हाण, निर्मला भोयर, बघेले,आदी मान्यवर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे या दिवशी महाराष्ट्रातील मराठी माणसे हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात १ मे दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र राज्य निर्मितीस बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार टि पी डावखरे सर यांनी केले.