विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आत्मसात करावी करावी: डॉ. टी. पी. येडे

0
30
1

प्रतिनिधी/पंकज रहांगडाले 

गोरेगाव : विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील संघर्षातून मार्ग कश्याप्रकारे काढता येतो याचा अभ्यास करावा व जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांची शिकवण आत्मसात करावी असे उद्गार डॉ टी.पी.येळे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित समारंभात व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता पी डी राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे संस्थेचे अध्यक्ष डाॅ.टी पी येळे यांच्या हस्ते व प्राचार्य सी डी मोरघडे व पर्यवेक्षक ए.एच. कटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने जी.डब्ल्यू.रहांगडाले, आर.टी.पटले, एस.पी.तिरपुडे, वाय.के.चौधरी, एस.आर.रहांगडाले, एस.आर.मांढरे, ए.एस.बावनथडे, एस.जी.दमाहे, डी.एम.राठोड, एस.एम.नंदेश्वर, ए.जे.सोरले, झेड.सी.राऊत, विद्यार्थी व प्रतिष्ठित गावकरी मंडळी उपस्थित होते. अध्यक्ष महोदयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांनी स्वीकारून तसे वागायला पाहिजेत असे सांगितले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गीताचे सामुहिक गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी चाटे यांनी केले.