आमगाव : येथील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तर्फे दि. १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आले. या वेळी हमाल कामगार युनियनचे अध्यक्ष सुरेश बागडे यांच्या हस्ते झेंड्याचे पूजन व झेंडा फडकविण्यात आले व सलामी देण्यात आली. जयघोसाच्या आवाजात फटाके फोडून वंदन करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक प्रतिमेला माल्या अर्पण करून पूजन करून तसेच गांधी प्रतिमेला पूजन व माल्यार्पण करून 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आले.
कार्यक्रम पिंकेश शेंडे सामाजिक कार्यकर्ता व उपाध्यक्ष अनुसूचित जाती काँग्रेस कमिटी आमगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व याप्रसंगी हमाल कामगार युनियनचे सचिव बंडू कुसराम, उपाध्यक्ष दिलीप तरोणे, कोषाध्यक्ष राजू तरोने, किशोर चुटे ,लक्ष्मण गायधने हंसराज ब्राह्मणकर ,संतोष पुंडे, बाळकृष्ण शहारे, सोमा चव्हाण, शिवशंकर फुंडे ,गुड्डू शेख, महेश नागवंशी ,गुड्डू सूर्यवंशी सर्व हमाल कामगार युनियन व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित असून सहकार्य केले.