गॅस धारक ग्राहकांना विहित कायद्याची जाणीव करून द्या

0
18
1

➡️अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मांगणी……
➡️तहसिलदारांना दिले निवेदन…

तिरोडा / पोमेश राहंगडाले

अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा तालुका तर्फे गुरूवार दि.२ मई २०२४ रोजी तहसिलदार यांना निवेदन देऊन गॅस धारक ग्राहकांना विहित कायद्याची जाणीव होने करीता गॅस गोडाऊन व कार्यालय येथे विहित नियमावली लिहुन ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून फसवणूक होणार नाही याकरीता दक्षता घेऊन ग्राहकांनी प्रत्यक्ष तक्रार करण्याकरीता समोर येणे गरजेचे असुन आॅनलाईन बुकींग केल्यानंतर किती तासात घर पोच हंडा देणे, हंडेचे वजन करून देणे, नविन कनेक्शन घेते वेळी शेगडी घेणे बंधनकारक नाही, गोडाऊन मधून कोणी ग्राहकाने हंडा घेऊन गेल्यास अतिरिक्त रक्कम कमी करणे इत्यादी ची दखल होऊन ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होणे बाबद निवेदन देऊन मांगणी करण्यात आली आहे.
तिरोडा शहर व ग्रामिण परिसरात एकूण तिरोडा, नवेझरी व गंगाझरी अशी तीन एजन्सी आहेत.
निवेदन देते वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा चे तालुका मार्गदर्शक अब्दुल रफीक शेख, अध्यक्ष-सुशिल भातनकर, सचिव-महादेव घरजारे, संगठन मंत्री-वाल्मीक राऊत, मोहपत मानकर, इत्यादी पदाधिकारी हजर होते.