छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित मोफत पाच दिवसीय ” बालसंस्कार व शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण” शिबिराचा समारोप.

0
36
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

शिवकार्य व समाजकार्यात सतत अग्रेसर असणारे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित करण्यात आलेले पाच दिवसाचे मोफत बालसंस्कार व शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यात प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळाविषयीची माहिती बालकांना व्हावी त्यांना स्वसंरक्षण व शारीरिक स्वास्थ्य इत्यादी मध्ये असल्या खेळांचे जीवनात काय स्थान आहे इत्यादींचा परिचय व्हावा या उद्देशाने शिबिरातून मोफत प्रशिक्षणाची सोय प्रतिष्ठान करवी करण्यात आली . एकूण 74 मुला मुलीनी यात सहभाग घेऊन दांडपट्टा, लाठ्या – काठ्या, तलवारबाजी यासारख्या पारंपरिक, शिवकालीन तर जुडो, तायक्वांडो यासारख्या पाश्चात्त्य कला खेळांचे परिचय व प्रशिक्षण यामाध्यमातून प्रशिक्षणार्थी मुला-मुलींना देण्यात आले. यासोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,विविध क्रिडा प्रकार जसे ॲथलेटिक्स, एरोबिक्स इत्यादीचा परिचय व भविष्यात आपल्याला स्पर्धेतून विविध स्तर कसे गाठता येतील या विषयीची माहिती तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणुन नवोदय, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप परीक्षा इत्यादीची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. बालसंस्कार शिबिर अंतर्गत शिस्त आणि वेळेचे महत्व, चांगल्या सवई,चांगली शरीरयष्टी आरोग्य,स्मरणशक्ती विकास, शरीर स्वच्छता व स्वास्थ्य,थोरामोठ्यांचा आदर व सन्मान, व्यक्तिमत्त्व विकास, समाजातील आपली भूमिका, समाजसेवेचे महत्व मोबाईल, टीव्ही इत्यादीचा गैरवापर व होणारा दुष्परिणाम अशा अनेक बाबींची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. यावेळी मार्गदर्शक वक्ते म्हणुन पोलीस स्टेशन तुमसर येथील पी.स.आय. श्री. गंगवाणी सर, नगरपालिका तुमसर चे उपविभागीय अधिकारी श्री. साळुंखे सर, श्री. सावके सर बारस्कर कोचिंग क्लासेस चे श्री. बारस्कर सर, इत्यादींनी शिबीर स्थळी भेटी देऊन सहकार्य केले. तर शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षक वस्ताद श्री. उपासराव सोनावणे व त्यांचे सहकारी प्रशिक्षक यांच्या उत्कृष्ट तालमीत प्रशिक्षणार्थ्यांना पाच दिवसीय शिबिरात प्रशिक्षण पूर्ण करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या आयोजनांतून पार पडलेल्या या शिबिराला पालकांच्या विश्वासार्हतेतून योग्य असा प्रतिसाद मिळाला. यासाठी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, यांची संकल्पना प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर यांचे संकलन व प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष विक्की साठवने, कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे,अंकुश गभने, प्रज्वल बुद्धे, नितीन सार्वे, गितेश गणोरकर, सुमित जिभकाटे, मनोज बोपचे तुषार बागडे, मयूर पुडके, संकेत बुधे, अंकित तुमसरे, भूषण पडोळे, मनीष गायधने, विवेक ठाकरे, हाऊसिलाल ठाकरे, दिपाली मते, पूजा सिंगजुडे, खुशी भोयर व इतर मावळ्यांच्या परिश्रमातून व सर्वांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाला. सर्वांचे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान च्या वतीने मनःपूर्वक आभार