तुमसरे कुटुंबियांसाठी संजय पुराम यांनी दिला मदतीचा हात 

0
39

आमगाव : येथील निंबारते लॉन कामठा मार्ग येथे लग्न समारंभात मंडप लावतानी एका मजुराची करंट लागून मृत्यू झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी घडली , सदर घटनेची दखल माजी आमदार संजय पुराम यांनी घेतली मृतक राकेश गजानन तुमसरे वय २४ रा.साखरीटोला (सालेकसा ) हा रोजंदारीनी मंडप डेकोरेशनच काम करायचं पण निंबारते लॉन येथे मंडपा जवळहुन हाय व्होल्टेज लाईन गेली आहे,त्या ठिकाणी मृतक मजूर लोखंडी खांब लावत असतांना करंट लागल्याने मृत्यू झाला होता.

निंबारते लॉन मधून पलीकडे पावर हाऊस (११ केव्ही) करिता विधुत तार गेले आहे, पण काही दिवसापासून जवळील शेतीतील खांब वाकल्याने तेथील तारांचा झुकावं लॉन मध्ये आल्याने मृतक राकेशचा विधुत सॉक लागून मृत्यू झाला.

मृतक च्या कुटूंबात पत्नी, दोन महिन्याचा आणि दुसरा १ वर्षाचा मुलगा आहे, मृतकाच्या कुटुंबाची परिस्थिती हलाकीची, आणि भूमिहीन आहे, त्यांचे संसार उघड्यावर येऊ नये,त्यामुळे सदर कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी या दृष्टीकोनातून एका दैनिकाने बाजू मांडली.

सदर वृताची दखल संजय पुराम यांनी घेउन सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील तुमसरे कुटूंबीयांची भेट घेतली आणि मृतक राकेशची पत्नी सरिता राकेश तुमसरे यांना आर्थिक मदत केली तसेच मोठया मुलगा कार्तिक याची इयत्ता पहिली पासून पदवी पर्यंत शिक्षणाची जवाबदारी स्वीकारली.

तेथील जेष्ठ कार्यकर्ते हेमराज सुलाखे यांना विधवा पेन्शन, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना या बाबद अर्ज करायला मृतकच्या पत्नीला मदत करावी असे सांगितले. शेवटी मृतक च्या कुटुंबियांची सांत्वना केली.

या वेळी खेमराज सुलाखे,लोकमतचे प्रतिनिधी राजीव फुंडे,खुमानसिंह उपराडे,प.स उपसभापती नोहरलाल चौधरी,चैनसिहं मच्छीरके, भगत,रोशन बनसोड,मदनलाल सुलाखे,धर्मशीला सुलाखे,युवराज सुलाखे, हितेश सुलाखे,अनिल तुमसरे, साहेबदास सुलाखे शिवदास सुलाखे आदी उपस्थित होते.