नागपूर जिल्हा क्रीडा स्पर्धेत विद्यार्थिनीचे सुयश

0
72

आमगाव- नागपूर डिस्ट्रिक्ट अथलेटिकस असोसिएशन नागपूर, द्वारा सुरू असलेल्या वार्षिक जिल्हा क्रॉस कंट्री व ओपन ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये स्थानिक भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. अनुष्का बोदेले हिनी लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक, 200 मीटर रीले रेस मध्ये द्वितीय क्रमांक, 400 मीटर रिले रेस मध्ये प्रथम क्रमांक पटकावीत महाविद्यालयाला क्रीडा क्षेत्रात उच्चांक गाठविला. सदर क्रीडा स्पर्धा ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या पटांगणात घेण्यात आली होती.

सदर क्रीडा महोत्सवात यशस्वी होण्यामागे अनुष्काने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. संघी, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख व उपप्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर तसेच भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक श्री. केशवरावजी मानकर यांचे अभिवादन केले.

Previous articleतुमसरे कुटुंबियांसाठी संजय पुराम यांनी दिला मदतीचा हात 
Next articleचुल्हाड बस स्थानक येथे भरधाव वेगाने जात असलेला कंटेनर पलटला, सुदैवाने जीवित हानी टळली