चुल्हाड बस स्थानक येथे भरधाव वेगाने जात असलेला कंटेनर पलटला, सुदैवाने जीवित हानी टळली

0
7
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

तुमसर तालुक्यातील भंडारा-बालाघाट राज्यमार्गावरील चुल्हाड बस स्थानक येथे आज दिनांक 3 मे रोज शुक्रवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. सविस्तर वृत्त असे की, कंटेनर क्रमांक MH-31 FC 6855 च्या कंटेनर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालविले यामुळे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटले. या घटनेत रस्त्यावरून जात असलेले प्रवासी सुदैवाने बचावले असून मोठा अनर्थ टळला. दरम्यान सदर घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा अधिक तपास सिहोरा पोलीस करीत आहेत.