आदर्श विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे निकाल जाहीर

0
101
1

आमगांव : आदर्श विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील संकलित सर्वकष मूल्यमापनाचे निकाल दिनांक ६ मे रोजी सकाळच्या पाळीत जाहीर करण्यात आले.
वर्ग ५ ते ९ व वर्ग ११ वा चे निकाल प्राचार्य डी एम राऊत यांनी जाहीर केले व वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना समोर बोलावून सन्मानित केले.
या प्रसंगी मंचावर शाळेचे उप मुख्याध्यापक डी बी मेश्राम, पर्यवेक्षक  यू एस मेंढे, मिडल स्कूल परीक्षा प्रमुख कु ए के मानकर, हाय स्कूल परीक्षा प्रमुख श्रीमती पी पी बिसेन व कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा प्रमुख एस एस प्रजापती उपस्थित होते.
या प्रसंगी वर्ग शिक्षकांद्वारे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप करण्यात आले.
पुढचे सत्र व शाळा दिनांक १ जुलै पासून सुरू होईल असे प्राचार्य डी एम राऊत यांनी जाहीर केले.