VNR सीड्स प्राइवेट लिमिटेड रायपूर तर्फे रब्बी धान पीक पाहणी आणि शेतकरी चर्चा सत्र

0
8
1

गोंदिया / महेंद्र लिल्हारे

दि.०६ मे २०२४ रोजी भंडारा जिल्ह्याच्या आसगाव तालुक्यातील पवनी येथे VNR सीड्स प्राइवेट लिमिटेड रायपुर अंतर्गत पूर्व विदर्भ फील्ड क्रॉप टीम तर्फे रब्बी पिक पाहनी आणि येणाऱ्या खरीप पूर्व हंगाम बियाणे माहिती कार्यक्रम चा आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांना VNR सीड्स चे हायब्रीड धान बियाणे VNR २१११ (१०० ते १०५ दिवस),VNR २२४५ १२० ते १२५ दिवस), VNR २३१८ (१३० दिवस) आणि VNR २३५५प्लस (१३० ते १३५ दिवस) यावर सविस्तर माहिती तसेच धानावर येणारे रोग,किडी,तन नियंत्रणाचे,खत ववस्थापन मार्गदर्शन VNR सीड्स प्राइवेट लिमिटेड पूर्व विदर्भ क्षेत्र अधिकारी मनोजकुमार बघेले साहेब यांचा तर्फे करण्यात आले.

उपरोक्त कार्यक्रमात आसगांव आणि लगतच्या गांव शेतकरी उपस्थित होते,आसगांव चे प्रगतिशील शेतकरी योगेश सीताराम हत्तीमारे यांचे सत्कार कार्यक्रमात करण्यात आले.या कार्यकमात गावांतील व आजुबाजूच्या परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशश्वी करण्याकरिता जयलक्ष्मी कृषि केंद्र आसगांव चे संचालक मंगेश बोरकर VNR सीड्स चे  राकेश कठाणे, VNR सीड्सचे रवि कटरे आणि आसगाव निवासी शेतकरी बंधूनी परिश्रम घेतले.