अहेरी /प्रतिनिधी
मानव विकास मिशनची अहेरी छलवाडा ही बस नियमित पाठवावे या मागणीचे निवेदन भगवंतराव हायस्कूल कमलापूरचे मुख्याध्यापक आर जे शेख यांनी आगार व्यवस्थापक अहेरी यांना निवेदन दिले आहे. सविस्तर असे की मानव विकास मिशनची अहेरी छलवाडा ही बस सकाळ पाळीत नियमीत येते.. परंतु सायंकाळी मात्र ती अनियमित येते त्यामुळे अनेक विद्यार्थिनींना याचा फटका बसतो किमान 2024 – 25 या शैक्षणिक सत्रात सदर बस सायंकाळच्या वेळी नियमित यावे यासाठी नियोजन करण्यात यावे या मागणीची निवेदन आज मुख्याध्यापक आर. जे.शेख यांनी अहेरी चे आगार व्यवस्थापक घागरगुंडे यांना दिले आहे.