सृजन स्कूलच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम ……..

0
127

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :- 09 मे 2024

देवळी :- येथील सृजन इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले होते. याबद्दल विजयी व सहभागी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्टेयर्स फाऊंडेशन द्वारा आयोजित २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधित कब्बडी, हॉलीबॉल, व फुटबॉल स्पर्धा नई दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

कबड्डी स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुले या गटामध्ये उत्तम कामगिरी करून यश संपादन केले. त्यात यग्य दुर्गे, वेदांत उईके, शौर्य दुधे , धैर्य दुधे या विद्यार्थ्यांनी आपले मोलाचे योगदान दिले. तसेच हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुली या गटामध्ये सृष्टी दुर्गे व भैरवी तराळे या विद्यार्थांनी उत्तम कामगिरी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. व १४ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये आदर्श रघाटाटे, सार्थक मनभे, सुदर्शन पवार, या विद्यार्थ्यांनी राजस्थान संघाबरोबर चुरशीची लढत देत द्वितीय स्थान पटकविले. तसेच कबड्डी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये खुशबू उईके , फुटबॉल स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सैयद फैझ , व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये शौर्य कांबळे या विद्यार्थींनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांचे अथक परिश्रमाने शाळेचे व पालकांचे नाव उंचावले आहे. ही देवळी शहर वासियांकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे. कि देवळी शहरातील विद्यार्थ्यांनी या स्तरावर आपले नाव लौकिक केले. स्टेयर्स फाऊंडेशन महाराष्ट्र प्रमुख राजेंद्र बानमारे, राजू भगत, स्मिता बंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा पंकज चोरे मॅडम, डॉ. प्रशांत चव्हाण सर, मुख्याध्यपिका प्रिया वैद्य क्रीडा, शिक्षक सुरज डाखरे व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपले श्रेय आपले शिक्षकांना आणि पालकांना दिले.

Previous articleअहेरी छल्लेवाडा मानव विकास मिशनची बस नियमित वेळेवर पाठवा :- मुख्याध्यापक आर. जे.शेख यांचे निवेदन
Next articleपत्नी, बेटे, ससुर को मारने वाले दामाद को फांशी की सजा