घानोड येथील जंगल शिवारात अवैध हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर सिहोरा पोलिसांची धाड

0
5
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या घानोड येथे दिनांक 9 मे रोजी सिहोरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घानोड येथील जंगल शिवारात सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर धाड घातली. यात आरोपी अजय राजेश बागडे रा. सोंड्या, ता. तुमसर याच्या ताब्यातून आठ प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवलेल्या 240 किलो मोहपास सडवा व दारू गाळप करण्याचे इतर साहित्य असा एकूण 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आरोपी विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई तीलकचंद चौधरी, पोलीस शिपाई संतोष शिंदने यांनी केली असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार नितीन मदनकर करीत आहेत.