जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथे काल दि.11 मे रोजी एका युवकाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की, शंकर शिवरतन चाचीरे, वय 33 वर्षे, असे मृत युवकाचे नाव असून तो एका दुर्धर आजाराने त्रस्त होता दरम्यान त्याने विविध औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर त्याने आजाराला कंटाळून स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी घटनेचा मर्ग आंधळगाव पोलिसात दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज साकोरे करीत आहेत. यावेळी शंकर चाचीरे याच्या मृत्युने मात्र गावात हळहळ व्यक्त केला जात आहे.