1 फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे स्टेशन गोंदिया येथील प्लॅटफार्म नं.1 जवळील चौकशी कार्यालया जवळ एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 45 ते 50 वर्ष हा मरण पावल्याने स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन गोंदिया व रेल्वे डॉक्टर यांचे मेमोवरुन रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया येथे अ.मृ.नं.4/2024 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला आहे. नमूद अनोळखी व्यक्तीचे नाव, गाव तसेच नातेवाईकांचा शोध घेतला असता कोणतीच माहिती मिळालेली नाही.
अनोळखी पुरुषाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. वय- अंदाजे 45 ते 50 वर्षे, उंची- 5 फुट 5 इंच, चेहरा- गोल, बांधा- साधारण मजबूत, डोक्याचे केस- पांढरे/काळे, नेसनीस- काळ्या रंगाचे स्वेटर व पांढऱ्या हिरव्या रंगाचे लाईन शर्ट. तरी अशाप्रकारचे वर्णन असलेले अनोळखी पुरुष कोणाचे नातेवाईक असल्यास संबंधितांनी रेल्वे पोलीस ठाणे, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथील तपासी अंमलदार दुर्योधन भजभूजे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.