सीबीएसई बारावी परीक्षेत मेरीटोरीयास पब्लिक स्कूलचा मंथन खेताडे जिल्ह्यात प्रथम तर कु.महेक अग्रवाल १०वीत तिरोडा तालुक्यात प्रथम

0
86

तिरोडा / पोमेश राहंगडाले

आज दि.१३ मे २०२४ रोजी  केंद्रीय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी बारावीच निकाल जाहीर झाला. गोंदिया जिल्ह्यातून तिरोडा येथील मेरीटोरीयास पब्लिक स्कूलचा मंथन खेताडे यांनी बारावीत प्रथम स्थान पटकावला आहे तर दहावीत तिरोडा तालुक्यातून महेक अग्रवाल प्रथम राहिली. मंथन खेताडे याने ९६.२० टक्के गुण प्राप्त केले आहे. कु.महेक अग्रवालने ९६.६० टक्के गुण मिळविले. मंथन खेताडे याने दहावीतही जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान मिळवला होता. नुकतेच, त्याला जेईई मुख्य परीक्षेत ९९.७० टक्के गुण मिळाले आहेत. शाळेतील ८ विद्यार्थ्यानी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे. यंदाही मेरिटोरियस पब्लिक स्कूलने जिल्ह्यात व तालुक्यात अग्रस्थान कायम ठेवले आहे. यशस्वी विद्यार्थ्याचे संचालक मुकेश अग्रवाल, राणी अग्रवाल, प्राचार्य तुषार येरपुडे त्यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी त्यांचे कौतुक केले आहे.