श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शाळेतील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे सुयश , शंभर टक्के निकाल शाळेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

0
88

गोंदिया/धनराज भगत

 केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई)घेतलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (१३मे) जाहीर केला यात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले.
श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या भव्यपटांगणात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पत्रकार धनराज भगत सर, शाळेचे संचालक लीलाधर कलंत्री सर ,गोयल सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मृती छपरिया मॅम शिक्षक वृंद इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता बारावी मध्ये पहिला क्रमांक थलश्री नंदेश्वर (८७.४%) दुसरा क्रमांक सानिध्य असाटी(८५.६%) आणि तिसरा क्रमांक शार्दुल मेंढे (७८.८%) याने पटकावला.
इयत्ता बारावी मध्ये डिस्ट्रिक्शन मध्ये४ विद्यार्थी, फर्स्ट डिव्हिजन १२ विद्यार्थी, सेकंड डिव्हिजन ४ विद्यार्थी असे वीस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक चिंतन भुसारी (९७%) दुसरा क्रमांक कु.आरुषी अग्रिका (९५%) आणि तिसरा क्रमांक शांतनु ब्राह्मणकर (९४%) याने पटकावला.
इयत्ता दहावीत मेरीट मध्ये-०६ विद्यार्थी, डिस्ट्रिक्टशनमध्ये ३१ विद्यार्थी, फर्स्ट डिव्हिजन -३१ विद्यार्थी ,सेकंड डिव्हिजन- ०८ असे मिळून -७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती .त्यात सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
शाळेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थी सह पालकांना पुष्पगुच्छ ,डायरी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शाळा शिक्षक व पालकांना दिले.