के .के.इंग्रजी प्रायमरी शाळेतील पहिल्या दहावी CBSE बॅच च्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद

0
7
1

गोंदिया / धनराज भगत

केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्लीतर्फे फेब्रुवारी 2024 ला घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकाल घोषित करण्यात आला. या परीक्षेत के.के. इंग्रजी प्रायमरी शाळा आमगाव येथील दहावीचा विद्यार्थी प्रज्वल टीकाराम मस्के 90% गुण घेऊन प्रथम, चारू पुरुषोत्तम बिसेन 88% गुण घेऊन द्वितीय तर दर्पण परमेश्वर बोपचे 84% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्यानुसार शाळेचा निकाल शंभर टक्के लागला.शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था संचालक केशवरावजी मानकर,  सुरेश बाबूजी असाटी,  प्रमोद जी कटकवार तसेच शाळेचे कार्यकारी डॉक्टर डि.के. संघी सर, प्राचार्या श्रीमती रीना भूते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.