छत्रपती संभाजी महाराज जयंती सालेकसा येथे साजरी

0
2
1

सालेकसा/ बाजीराव तरोने

स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सालेकसा येथे दिनांक 14 मे 2024 रोज मंगलवार ला कुणबी सेवा समिति तालुका सालेकसा व मित्र परिवार च्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केले. त्या प्रसंगी ब्रजभूषण बैस यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राजाचे दुसरे छत्रपती व थोर कुर्तृत्ववान पुरुष होते. रणांगणावरील मोहिमा आणि डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहापणापासूनच मिळाले. संभाजीराजे हे अनेक भाषेत विदयाविशावरद व अत्यंत धुरंदर राजकारणीय होते असे आपल्या मनोगत मांडले तसेच सचिन बहेकार कुणबी सेवा समितीचे कोषाध्यक्ष यांनी संभाजी महाराज सदैव प्रजेला मदत करणारे प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे राजे होते असे आपल्या मनोगतात सांगितले. जयंती प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश रोकडे यांनी मांडले व कार्यक्रमाला उपस्थित रवी चुटे, संदीप अग्रवाल, दिलीप साखरे, तरुण मेंढे, विलास फुंडे, हरीश बहेकार, अविनाश बहेकार, संदीप तिरपुडे, डॉ. चौरागडे, निशा बागडे, मुन्नीताई फुंडे व समस्त बहेकार कॉम्प्लेक्स चे सर्व व्यापारी जयंती प्रसंगी उपस्थित होते.