देहदानी रामभाऊजी ऊर्फ नानाजी इंगोले स्मृतीदिनाप्रित्यर्थ ‘आपले संविधान – आपली जबाबदारी’ विषयावर जाहीर व्याख्यान…..

0
6
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे

दिनांक :-15 मे 2024

देवळी – मानव समाज विकसन संस्था, इंगोले परिवार तथा अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तालुका शाखा देवळी तर्फे रविवार दिनांक १९मे २०२४ला सकाळी ९.३०वाजता, वैद्यपुरा, देवळी येथे संपन्न होत आहे. देहदानी रामभाऊजी ऊर्फ नानाजी इंगोले स्मृतीदिनाप्रित्यर्थ ‘आपले संविधान – आपली जबाबदारी’ विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून. ई. झेड. खोब्रागडे, ( IAS) निवृत्त जिल्हाधिकारी ,प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डाॅ. सुभाष खंडारे, वर्धा तसेच उद्घाटक म्हणून सार्थक नेहेते, ठाणेदार, पोलिस स्टेशन, देवळी उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी शरीररचनाशास्त्र विभागाचे म.गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्रामचे प्रमुख, मा.प्रा.डॉ.ज्वलंत वाघमारे, जवाहरलाल नेहरू वैद्यकिय महाविद्यालय,सावंगी (मेघे) येथील प्रमुख प्रा. डॉ. वैभव अंजनकर, अ.भा. सत्यशोधक समाजाचे जेष्ठ सत्यशोधक प्राचार्य जनार्दन देवतळे,वर्धा, जिल्हाध्यक्ष गुणवंत डकरे,अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे (तिगांवकर),जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारे, जिल्हा उपाध्यक्ष दादाराव मून, देवळी तालुका अध्यक्ष नरेश ढोकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.  याप्रसंगी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२४ मधील वर्धा जिल्ह्यातील देहदानी तथा अवयवदानी परिवारातील सदस्य तथा सत्यदीप समाजभूषण गौरव सन्मान दिवंगत प्रा. पंकज चोरे यांच्या वतीने डॉ. श्रद्धा पंकज चोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तरी या देहदान लोकजागर कार्यक्रमाला अवयवदानी तथा देहदानी परिवारातील सदस्यांनी उपस्थिती दर्शविण्याकरिता संपर्क करण्याचे आवाहन कार्यक्रम संचालक अजय इंगोले ( मो.नं. 9421703391 )यांनी केले आहे.