1
हलबिटोला सुरजाटोला मार्गावर घडले प्रकरण
सालेकसा/ बाजीराव तरोने
उन्हाळा सुरू झाला की परिसरात काही ना काही नवीन प्रकरण घडून येतातच असाच एक प्रकरण सालेकसा तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथे आज 19 मे रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडल्याचे दिसून आले. हलबीटोला येथील बेरोजगार कबाडी दुकानदार देवेंद्र भोयर हे आपल्या प्रतिदिन प्रमाणे आपला धंदा मजुरीला जात असताना हलबीटोला ते सुरजाटोला या मार्गावर जंगल शिवारात तीन अनोळखी व्यक्तीद्वारे त्यांना थांबवून लूटपाट करण्याचे प्रकरण समोर आले.
या व्यक्तीचे त्यांनी कपडे फाडले जवळील असलेली रक्कम ते हिसकावून घेतले. तसेच या व्यक्तीची जीवित हानी होण्याची सुद्धा शक्यता टाळता आली नसती. या प्रकरणाला बघून परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे. तसेच अनोळखी व्यक्ती सदर परिसरात आढळल्यास पोलिसांना किंवा स्थानिक नागरिकांना त्वरित कळविण्याचे आवाहन सुद्धा नागरिकांनी केले आहे.
कृपया वाटसरुनी सावध राहावे- स्थानिक नागरिकांचे आवाहन
हलबीटोला सुरजाटोला मार्गावर काही अनोळखी व्यक्तीद्वारे लुटपाट करण्याचे प्रकरण समोर आले आहे. परिसरातील नागरिकांनी येजा-करतानी नी सावध राहावे आणि अनोळखी व्यक्ती आढळल्यास कुणीही रस्त्यात न थांबता त्वरित पोलिसांना किंवा स्थानिक नागरिकांना याची सूचना द्यावी.