HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा

0
124

बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. आता येत्या 21 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
‘या’ वेबसाईटवर पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://result.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org

Zee24 Taas

Previous articleअँड.रामचंद्र सुरेंद्रराज डोये यांचे निधन
Next articleवाळू माफीया विरूध्द उपविभागीय पुलगांव व देवळी पोलीसांची कार्यवाही……..