वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-20 मे 2024
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16.05.2024 रोजी सकाळी 08.00 वाजता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी , पुलगांव यांना मिळालेल्या गोपणीय माहिती वरून त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात मौजा अंदोरी रोडनी पेट्रोलींग करीत असतांना मौजा अंदोरी कडुन एक टिप्पर व एक ट्रॅक्टर येत असतांना दिसुन आला असता सदर टिप्पर व ट्रॅक्टर चालक यांना हात दाखवुन थांबवीले असता सदर टिप्पर चालक गजानन अंबादास परचाके रा. धोत्रा यांनी सागीतले की सदर टिप्पर क MH36 F 2911 हा निलेश तिजारे रा. वर्धा याचे मालकीचा असुन रेती साती घाटामधुन भरून आनल्याचे सांगत होता. सदर ट्रॅक्टर चा चालक नामे प्रभाकर इशेश्वर नेवारे रा. अंदोरी यांनी सांगीतले की सदर ट्रॅक्टर हा रवी पारीसे रा.अंदोरी यांचा असुन अंदोरी येथील वर्धा नदी घाटामधुन रेती भरून आणल्याचे सांगत आहे. सदर टिप्पर व ट्रॅक्टर ट्रॉलीची पाहणी केली असता. त्यामध्ये काळी ओलसर रेती काटोकाट भरून असलेली दिसुन आली असल्याने सदर चालक यांना रॉयल्टी पास परवाना बाबत विचारले असता पास परवाना नसल्याचे सांगीतल्याने सदर रेती (गौण खनीज) ची अवैद्य वाहतुक करीत असतांना मिळुण आल्याने सदर टिप्पर व ट्रॅक्टर ट्रॉलीवर महसुली कार्यवाही करण्या करीता मा. तहसीलदार देवळी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कार्यवाही मा. वर्धा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, सहा. पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण उप विभाग पुलगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळी निरीक्षक सार्थक प्र. नेहेते सफौ. किशोर साखरे, पोहवा. कुणाल हिवसे, पोशी मनोज नप्ते, शुभम कावडे, गणेश इंगळे, भूषण हाडके यांनी केली.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.