अनाथांची माय- प्रा.डॉ. सविता बेदरकर

0
7
1
  सुगरणीच व्रत धारण करुन असंख्य अनाथांना मायेचा पदर देणाऱ्या प्रा. डॉ सविता बेदरकर मला गोंदिया येथील समाज कार्य महाविद्यालय मराठीचा प्राध्यापिका म्हणून लाभल्या. जून 2015 मध्ये मैडम पहिलीच तासिका घ्यायला आल्या आणि पहिल्याच तासिकेत सगळ्या विद्यार्थ्यांना एक नवी ऊर्जा देऊन गेल्या. व्यक्ती पूजण्यापेक्षा विचारपुजक बना हा गुण माझ्या नैसर्गिक स्वभावात होताच पण पहिल्याच तासिकेत हा संदेश अगदी मनाला भिडून गेला आणि तिथून प्राध्यापिका सविता बेदरकर माझ्या आवडत्या प्राध्यापिका बनल्या. त्यानंतर मॅडम सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये मी सोबत होतो एका दिवसात आम्ही दुचाकीने 300 ते 400 किलोमीटर प्रवास करत कार्यक्रम केले आहेत. यावेळी कशी कसरत करावी लागते ते आम्हालाच माहीत आहे. पण आपण जर समाजाचा विचार केला नाही तर समाजाचा काय होईल या विचाराने चक्क गोंदिया ते देवरी व देवरी ते साकोली असा प्रवास करून कार्यक्रम अडेन्ड केले आहेत.
जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधु ओळखावा,
देव तेथेची जाणावा…
या उक्तीप्रमाणे प्राध्यापिका डॉक्टर सविता बेदरकर यांनी समाजातील अनाथ व गरजू मुलांचा सांभाळ करण्याचा प्रयन्त उराशी घट्ट बाळगला असून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. गोंदिया येथील भोला भवन जवळून सुरू झालेला हा प्रवास अजूनही अखंड अविरतपणे सुरू असून अनेक गरीब अनाथ मुलांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे कार्य डॉ. सविता बेदरकर यांनी केले आहे. गोंदिया शहरातील भोला भवन जवळ तेरा वर्षीय मतिमंद मुलीला उघड्यावर मुल जन्माला आल्याचे बघून त्या माय-लेकांना न्याय मिळावा या हेतूने पोलिसांपासून तर कोर्टापर्यंत तारेवरची कसरत करावी लागली. एखाद्याच्या वाट्याला दुःख यावे तरी किती ? हे प्रकरण सुरूच राहिले आणि अखेर मुलीला महिला सुधार गृह आणि नवजात बालकाला अनाथालय याचा आधार मिळाला पण हे सगळे करत असताना जे कसरत करावी लागली ती निशब्द.
यानंतर प्राध्यापिका डॉक्टर सविता बेदरकर यांनी आपले जीवन रंजल्या-गांजल्या गोरगरीब जनतेसाठी वेचून दिले आपल्या कार्याने समाजात गरिबांच्या जीवनात प्रकाश यावा हा हेतू मनाशी बाळगून जीवनाचा खडतर प्रवास सुरू आहे ..
शब्दांकन- ✍️ देवेंद्र (बंटी) रहांगडाले 
आज आदरणीय गुरूवर्या # ज्यांनी सुगरणीचं व्रत धारण करुन असंख्य अनाथांना मायेचा पदर दिला # अशा ममतेचे महंत धनी # वात्सल्यसिंधू .# अनाथांची माय डॉ. सविता ताई बेदरकर यांचा वाढदिवस आहे.
आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..