आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा ,विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल, मित मुकेश असाटी तालुक्यातुन द्वितीय, वैष्णवी शेंडे तृतीय, तर कला शाखेतून प्रिया बागडे प्रथम

0
84

गोंदिया / धनराज भगत

आज जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. असुन विज्ञान शाखेतुन मित मुकेश असाटी याविद्यार्थिने ९२.१७% टक्के गुण मिळविले,वैष्णवीचैतराम शेंडे हिने ९१.१७ टक्के गुण मिळविले तसेच कला शाखेतुन प्रिया बागडे या विद्यार्थ्यांनीने ७०.३३टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने येण्याचा मान मिळविला आहे. तर मित असाटी या विद्यार्थी तालुक्यात द्वितीय ठरला आहे,
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने परिसरात दर्जेदार व नावीन्यपूर्ण उपक्रमांनी यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी , संस्थासचिव माजी आमदार केशवराव मानकर,उपाधयक्ष प्रमोद कटकवार, संचालक हरिहर मानकर, ललीत मानकर, रमेश कावळे, स्नेहा मानकर, प्राचार्य डि, एम, राऊत तसेच पर्यवेक् डि, बी मेश्राम,यु एस मेंढे प्रा, धकाते, प्रा, प्रजापती, प्रा, शेंडे, प्राध्यापिका हलमारे, पटले, अंबुले, सातोरकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.