रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय क़ुर्हाडी येथील विज्ञान शाखेचा १००% निकाल

0
9
1

गोंदिया / धनराज भगत

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळ पूणे मार्फत नागपूर विभागीय मंडळ नागपूर द्वारे आयोजित एच.एस. सी.परीक्षा फेब्रुवारी २०२४ मध्ये भवभूती शिक्षण संस्था आमगाव अंतर्गत रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुर्हाडी येथे विज्ञान विभागाचा निकाल १००% असून कला विभागाचा निकाल ८६% लागला आहे. विज्ञान विभागातून अंकित दिलीप पटले ८६% गूणासह कनिष्ठ महाविद्यालय व तालुक्यातून प्रथम आला असून द्वितीय क्रमांक कु.योगेश्वरी खेमराज कटरे हिला ७९%तर त्ऋतीय क्रमांक त्रिशा उत्तमलाल कटरे हिला ७६% मिळाले तसेच ईतर सर्व विद्यार्थी चांगल्या गूणासह पास झाली आहेत.
एच. एस.सी. परीक्षा कला विभागातून अनमोल कालिदास मेश्राम याने ७५% गूण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे,तर द्वितीय क्रमांकावर कु. प्रिती ज्ञानेश्वर साखरे हिला ६९%तर तृत्तीय क्रमांक कु.प्रियंका मोतिराम मेश्राम हिने ६८% गूण मिळविले आहे..तसेच ईतर विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तिर्ण झाले आहेत.
भवभुती शिक्षण संस्थे च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुरेश बाबु असाटी, कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक हरिहर मानकर, रमेश कावळे, ललीत मानकर, तसेच विद्यालयातील प्राचार्य के.एस.डोये सर,उपप्राचार्य जे.डी.जगणित सर,विज्ञान शिक्षक प्रा.  आर.आर.भेलावे सर.प्रा.के.आर.भदाडे सर,प्रा.एस.एन.उपराडे सर,प्रा.एस.एम.बोपचे सर,प्रा.तिवारी मँडम, कला विभागाचे प्रा. ए.आर.पटले सर.प्रा. किशोर नवखरे सर,प्रा.किशोर पटले सर.प्रा.अशोक बोरकर सर.प्रा.सौ.शितल बिसेन मँडम,प्रा.लक्ष्मण बारसागडे सर,प्रा. सुरेंद्र अंबुले सर, संगणक शिक्षक  सुनील रहांगडाले सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थांना घरी भेट देऊन पुष्पगुच्छ व मिठाई देऊन अभिनंदन केले..विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक व आपल्या आईवडिलांना दिले… प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनात यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.