बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन….. स्व. सेवकराम पारधी मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल कांबळे तुमसर तालुक्यात प्रथम…

0
65

भंडारा /सतीश पटले 

 दिनांक 21 मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शाळांचा निकाल हा उत्तम आहे तुमसर तालुक्यातील टेमणी येथील स्वर्गीय सेवकराम पारधी मेमोरियल हायस्कूल जुनियर कॉलेज चा निकाल ९०.३३% लागला आहे.. आज दिनांक २२ मे रोजी बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरून विद्यार्थ्यांचा अभिनंदन केला आहे. यात प्रथम क्रमांक कु. स्नेहल छगन कांबळे ( ८१.३३%)या विद्यार्थिनीने पटकावला असून ती तुमसर तालुक्यातून कला शाखेतून प्रथम आली आहे हे विशेष.यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य एस. पी.बोपचे यांनी विद्यार्थिनींच्या घरी जाऊन आज अभिनंदन केले आहे. यावेळी शिक्षक एस. एच. पारधी, सौ. एस. जी. शरनागत, एस. आर. मेश्राम, डी. बी. जाधव, बी. पी. पारधी, आर. डी. शरनागत, एस. आर. बोरकर एम. एम. कुंभारे उपस्थित होते.

Previous articleरामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय क़ुर्हाडी येथील विज्ञान शाखेचा १००% निकाल
Next articleगोंदिया : भीषण अपघातात एक मृत व एक जखमी