भीषण अपघातात चार ते पाच वाहनाचे नुकसान, पोलीस अधिकारी, कर्मचारी सह 5 ईसम गंभिर जखमी, 1 नागरीक मृत
गोंदिया / धनराज भगत
आज दि. 22/05/2024 चे सकाळी 10.45 वाजता ते 11.15 वाजता दरम्यान “सहयोग हॉस्पीटल” अवंती चौक गोंदिया ते रेल्वे क्रॉसींग द्वारका लॉन दरम्यान यातील अपघात करणारे आयसर वाहनाचे चालकाने आपल्या ताब्यातील आयसर वाहन अत्यंत भरधाव वेगाने चालवुन सुरवातीस सहयोग हॉस्पीटल समोर बस ला व त्यांनतर ट्रकला मागेहून जोराने धडक दिली. त्यानंतर रेल्वे क्रॉसींग द्वारका लॉन समोरील स्पीड ब्रेकर वर पोलीस वाहनास मागेहुन जोराने धकड दिल्याने वाहन अक्षरशः हवेत उसळुन पोलीस वाहनातील अधिकारी पो.नि. दिनेश लबडे, तर वाहन चालक मुरलीधर पांडे हे जखमी झाले असून बजाज हॉस्पीटल येथे उपचारार्थ भरती करण्यात आले आहेत. सदर वाहन अपघातात 4 ते 5 वाहने एकमेकांना मागेहून जोराने धडकल्याने भीषण अपघात घडलेला असून अपघातात एका मोटार सायकल स्वार ईसमाचा मृत्यु झालेला आहे. तर 3 ते 4 नागरीक किरकोळ, गंभीर जखमी झाले असल्याने जखंमीवर सहयोग हॉस्पीटल, गोंदिया येथे उपचार सुरू आहे. आयसर वाहनाचा चालक अपघात घडवून घटनास्थळावरून पसार झालेला असुन पोलीस पथक सदर वाहन चालकाचा शोध घेत आहेत. अपघाताची संपूर्ण परिस्थितीची, जखमिंची माहिती घेऊन सदर वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर घटनेवरून असे लक्षात येत आहे की, यातील आयसर वाहनाचे चालकाने स्वतःचे तसेच इतर लोकांचे जिवीताची, मालमत्तेची कुठलीही काळजी न घेता आपले ताब्यातील वाहन अत्यंत निष्काळजीपणे, हलगर्जीपणाने भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवून आणलेला असुन नागरीकांच्या जिवीतास व मालमत्तेची हाणी करून गंभीर जखमी करण्यास व एका इसमाच्या मरणास कारणीभुत ठरलेला आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्हयातील वाहन चालकांना विशेषतः नागरीकांना, युवा वर्ग यांना असे आवाहन करण्यात येते की, वाहतुक नियमनाचे, रहदारीचे काटेकोरपणे पालन करावे. शहरात, वस्तीत, रहदारीचे ठिकाणी कोणी वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालविताना आढळून आल्यास वेळीच सुज्ञ नागरीक या नात्याने पोलीसांना कळवावे. पोलीस नियंत्रण कक्ष क्र. ०७१८२-२३६१०० यावर तसेच डायल ११२ वर संपर्क करून वेळीच माहीती द्यावी. जेणेकरून वाहन अपघातावर वेळीच पायबंद करता येवून अपघाताचे प्रमाण कमी करता येईल व वाहतूक नियमांचे, कायदयाचे ज्ञान नसलेल्या वाहन चालकांवर कायदेशिर कारवाई करून वाहन अपघातावर प्रतिबंध करता येईल.