महादेव पहाडीजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या

0
9
1

गोंदिया / धनराज भगत

आमगांव तालुक्यातील नरसरी येथील बारावीच्या विद्यार्थ्यांने नापास झाल्यामुळे हतास झालेल्या मुलाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली. मोहित चंद्रप्रकाश पटले (१७) रा. ननसरी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना आमगावच्या महादेव पहाडी जवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. सायंकाळी ७ वाजता ही घटना वाऱ्यासारखी पसरतात आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले या घटनेसंदर्भात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तपास आमगाव पोलीस करीत आहेत.