रुपेरा येथे अवैध मोहफुलाच्या दारु अड्ड्यावर सिहोरा पोलिसांची धाड

0
3
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या रुपेरा येथे काल दि. 21 मे ला सिहोरा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी विलास रवींद्र खरोले रा. रुपेरा, ता. तुमसर याच्या शेतशिवारतील नाल्याच्या काठावर सुरू असलेल्या मोहफुलाच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातून 390 किलो मोहपास सडवा व दारू गाळप करण्याचे साहित्य असा एकूण 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात सहा.पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलीस शिपाई संतोष शिंदने, पोलीस शिपाई तिलकचंद चौधरी, पोलीस हवा. सव्वालाखे यांनी केले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आरोपी विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सिहोरा पोलीस करीत आहेत.