भरधाव ट्रक व पिकअप वाहनाच्या समोरासमोर धडकेत ट्रक चालक गंभीर जखमी.. बिनाखी येथील घटना..

0
17
1

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

तुमसर तालुक्यातील भंडारा-बालाघाट राज्यमार्गावरील बिनाखी येथे आज दिनांक 23 मे रोज गुरुवारला सकाळी 7 वाजता ट्रक व पीकअप वाहनाच्या धडकेत ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सविस्तर घटना अशी की, संजय भवरे रा. बालाघाट म.प्र.असे जखमी ट्रकचालकाचे नाव असून तो आपल्या ट्रक क्र. CG JA 7293 यात तांदूळ भरून नागपूरकडून बालाघाट कडे जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या विजय राऊत रा. पंचमुखी वार्ड बालाघाट हा आपल्या पिकअप वाहन क्रमांक MH 40 BL 5881या वाहनात भाजीपाला भरून बालाघाट कडून भंडाराकडे जात असता ट्रक व पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. सदर धडक इतकी भीषण होती की, ट्रक हा रस्त्याच्या कडेला शेतात पलटी झाला. यात ट्रकच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी नागरिकांनी जखमीला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथे दाखल केले. दरम्यान सदर घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना मिळताच सिहोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवा. मनोज इळपते करीत आहेत.