जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या सोंड्या येथे आज दिनांक 23 मे ला सकाळच्या सुमारास सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवा. महेश गिरीपुंजे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग वर असताना त्यांना घानोड कडून येणाऱ्या ट्रॅक्टर क्र.MP 50 A 1425 या वाहनात लाकडांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी लाकूड वाहतुकीचा परवाना मागितला असता ट्रॅक्टर चालकाने लाकूड वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. सदर ट्रॅक्टर मध्ये 4 टन खैर जातीचे लाकूड असून सदर लाकडाची किंमत 36 हजार रुपये असल्याची माहिती मिळाली. यावेळी विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक यश भाकचंद उर्फ बंटी शरणागत वय 21 वर्षे, रा. खैरलांजी, जि. बालाघाट म. प्र. याच्याविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर ट्रॅक्टर सिहोरा पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. दरम्यान घटनेचा अधिक तपास ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे व पोलीस हवा. महेश गिरीपुंजे करीत आहेत.

