गोंदिया : धनराज भगत
दरवर्षी उन्हाळ्याची चाहुल लागताच पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो. कधी पाणीपुरवठा होतो तर कधी नाही. नळ आल्यावर पाणी भरण्यासाठी लोकं टूल्लू पंपाचा वापर करतात. त्यामुळे अनेकवेळा लोकांना पाणी मिळत नाही. दरम्यान,(ता. २३ मे) गुरुवारी टुल्लू पंपधारकांवर नगर परिषदेने धड़क कारवाई केली.
आमगाव नगर परिषद परिसरात अशा अनेक वसाहती आहेत. तिथे नळांद्वारे पिण्याचे पाणी वितरित होत नाही.शहरात टुल्लू पंपाचा बिनधास्त वापर केला जात आहे. उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक गरज भासते. अनेक लोकं टुल्लू पंपाद्वारे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाणी टाकून टाकी भरतात. त्यामुळे त्यांच्याच परिसरात पाणी येत नाही. पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. इतर लाभार्थ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्याने जवळच्या विहिरी व बोअरवेलमधून पाणी आणावे लागत आहे. टुल्लू पंपाद्वारे वापरल्या जाणाऱ्या पिण्यायोग्य नळाच्या पाण्यापैकी ५० टक्के चोरी करून ते चारचाकी, दुचाकी, जनावरे धुणे आणि अंगणात वापरले जाते. त्यामुळे ते इतर कामात वाया जाते, हे नमूद करण्यासारखे आहे.
या समस्येकडे लक्ष देऊन नगर परिषद प्रशासनाने (पाणीपुरवठा पथक) न.प. प्रशासक तथा तहसीलदार डाॅॱ रविंद्र होळी व मुख्याधिकारी कु.करिश्मा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत रित्या नळाला टुल्लू पंप लावणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करुन त्यांचे टुल्लू पंप नगर परिषद द्वारे जप्त करण्यात आले.
अनेक दिवसांपासून नळ कनेक्शन धारकांच्या नळाला पाणी पुरवठा बरोबर होतं नाही ,अशा अनेक तक्रारी होत्या. कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली होती. नगर परिषद आमगाव च्या उपरोक्त कार्यवाहीत पाणीपुरवठा पथक कर्मचारी श्रीकिसन ऊके, राजेन्द्र शिवणकर राजेश पांडे,मुकेश वाकले, दिलीप फुंडे, सुरेन्द्र बोहरे,राजेंद्र शेन्द्रे ,माधोराव मुनेश्वर, राजेश डोंगरे , रतिराम डेकाटे शैलेश डोंगरे,ओमप्रकाश राहांगडाले, रामेश्वर श्रीभाद्रे,संजय चुटे आदि.कर्मचारी उपस्थित होते.

