गोंदिया / धनराज भगत
बुद्ध वन कुटी भवभूती नगर व भारतीय बौद्ध महासभा शाखा आमगांव (राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर) यांच्या संयुक्त विद्यमाने आमगांव येथे वैशाख पोर्णीमे निमीत्त दि.18/05/24 पासून प्रवज्या संस्कार व श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात 7 मुलांना श्रामनेर ची दिक्षा व संस्कार मुख्य प्रशिक्षक भंदन्त अश्वघोष यांनी दिली. कार्यक्रमाची सुरूवात भदन्त अश्वघोष व भारतीय बौद्ध महासभा शाखा आमगांव चे अध्यक्ष सुरेन्द्रकुमार खोब्रागडे, महासचिव सुधीर टेंभुर्णीकर यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदनाने करून महा परित्राण सुत्ताचे वाचन करण्यांत आले.त्यांत तालुक्यातील अनेक उपासक व उपासीकांनी आणलेल्या खिर चे वाटप केले तद्नंतर भारतीय बौद्ध महासभा शाखा आमगांव चे अध्यक्ष सुरेन्द्रकुमार खोब्रागडे यांनी उपस्थितांना भगवान बुद्धांच्या पंचशीलाचे पालन करून आपले जीवन मंगलमय करण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाची सांगता खिर व भोजन दानाने करण्यात आली. यावेळी धम्म उपासीका ॲडव्होकेट रंजीता खोब्रागडे,संगीता टेंभुर्णीकर,रत्नमाला नागवंशी,श्रद्धा शहारे,बिंदू शामकुवर,कल्पना साखरे, सुरभी खोब्रागडे, अंजली खोब्रागडे,अनिराम बौद्ध, अरूण खोब्रागडे, शेखर खोब्रागडे व नगरातील इतर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.