प्रतिनिधी/ पोमेश रहांगडाले
तिरोडा : तिरोडा येथील मराठी, हिंदी व पोवारी बोली चे सुप्रसिध्द कवी व गझलकार (साहित्यिक) अँड. देवेंद्र घनश्याम चौधरी हे बिसौली, जिल्हा- बदायूं (उ. प्र.) येथे सन्मानित होणार आहेत.
तिरोडा येथील सुप्रसिध्द कवी, गजलकार (साहित्यिक) व वकील अँड. देवेंद्र चौधरी हे “संस्कार भारती बिसौली” [बदायूं] ब्रज प्रान्त” द्वारा दिनांक ०८/०६/२०२४ रोजी आयोजित ‘काव्य गंगा महोत्सव’ मध्ये त्यांना गझल प्रस्तुत करण्यासाठी विशेष करून आमंत्रित करण्यात आले असून त्याच बरोबर त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगीरी बघून त्यांची निवड सन्मानासाठी देखील केली आहे. सदर सन्मान समारोहात देशातील विभिन्न राज्यातील जवळपास ६० ते ७० साहित्यिक यांची निवड करण्यात आली आहे.
हे विशेष की, कवी अँड. देवेंद्र चौधरी यांना आजपर्यंत त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर अनेकदा पुरस्काराने व सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी नेपाळ देशामध्ये आयोजित विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह मध्ये सन्मानीत करण्यात आले आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी यांनी मध्यप्रदेश मधील पांढुरना येथील अखिल भारतीय तिसरे पोवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले असून हा सन्मान त्यांच्या साहित्याच्या कारकीर्दीत भर टाकणारा आहे.