आठ हजाराची लाच घेताना रंगेहात सापडला पोलीस उपनिरीक्षक..!

0
16
1

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली तिसरी मोठी कारवाई…

गोंदिया / धनराज भगत

गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे. 7 मे 2024 ला गोरेगाव तहसीलदार, नायब तहसीलदार व एका खाजगी इसमाला लाच घेताना पकडण्यात आले होते. तर 14 में 2024 ला गोंदियाच्या सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारी सह नगराध्यक्ष व नगरसेवक अशा 6 लोकांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा पोलीस विभागातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. अनिल पारधी (54) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल असून तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात समझौता करून दिल्याचा मोबदल्यात 10 हजार रुपयाची लाच मागितली होती. तडजोडी अंती 8 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे. गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

साभार:सारस एक्सप्रेस