जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालीत आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी मार्फत, मार्च 2024 मध्ये नागपूर बोर्डाच्या वतिने आयोजित इ.10 वी चा निकाल 98.36 % लागलेला आहे. अर्थात खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयानी उत्कृष्ट व आकर्षक निकालाची परपंरा या वर्षीही जोपासलेली आहे. शाळेनी सिध्द केलेल्या गुणात्मक दर्जा वाढी प्रित्यर्थ शाळेचे सर्व परीक्षार्थी व पालक यांचे कडून शाळा प्रशासनासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचे कौतुक होत आहे. विस्तृत वृत्त असे की. मार्च 2024 मध्ये आयोजित इ.10 वी च्या परीक्षेत, विद्यालयातून-एकूण 184 परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 181 परीक्षार्थी उतिर्ण होऊन,शाळेचा 98.36 %निकाल लागला. प्राविण्य श्रेणीत 105 प्रथम श्रेणीत-70 द्वितीय श्रेणीत 05 तृतिय श्रेणीत-01 यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष -जगतराम रहांगडाले,सचिव- नारायणराव येळे, सहसचिव- सौ.विमलताई रहांगडाले उपाध्यक्ष-सौ.सी.एन.येळे ,कोषाध्यक्ष-डाॅ.सचिन रहांगडाले , से.नि.प्राचार्य खुशाल कटरे,प्राचार्य आर..के.कटरे, पर्यवेक्षक डी. डी. रहांगडाले,उमावि प्रभारी प्रा.वाय.टी.परशुरामकर, प्रा.संजय येळे, वरिष्ठ शिक्षक के.जे.लांजेवार, आर. जी. लांजेवार, जे. वाय. लंजे , प्रा.डी.के.मांढरे,प्रा. एस. जे. रामटेके,दिपक दिघोरे,तसेच सर्व उमावि ,मिडल व हायस्कूल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.