आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा बारावी विज्ञान शाखेचा १०० टक्के इयता दहावी चा ९६टक्के निकाल लागला आहे.प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या विद्यालयात भवभुती शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देवून (२८मे )रोजी सत्कार करण्यात आला. नुकतेच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षेत आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेतुन मित मुकेश असाटी या विद्यार्थ्याने ९२.१७% टक्के गुण मिळविले तो तालुक्यात दुसरा आला वैष्णवी चैतराम शेंडे हिने ९१.१७ टक्के गुण मिळविले. ती तालुक्यात तिसरी आली आहे तसेच कला शाखेतुन प्रिया बागडे या विद्यार्थ्यांनीने ७०.३३टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने येण्याचा मान मिळविला आहे
इयता दहावीत स्नेता दिनेश कुर्वे ९४.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय ठरली आहे.दिर्घा मुकेश असाटी हिने ९३.४०टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरी आली आहे. प्राची डिलेशवर गौतम ९३.२०,रुची डिलेशवर गौतम ९३ टक्के, श्रुती राजेश कटरे ९२.६० टक्के गुण, सारंगी धनराज भगत ९२.४० टक्के गुण, निमीशा ओकांर फुंडे ९२.२० टक्के, यशपाल उमाशंकर हतिमारे ९१.८० टक्के, सक्षम शोभेंद्र मेंढे ९१.६०टक्के, सुधांशू राजेंद्र चुटे ९१ टक्के, मोनिका अशोक राखडे ९१टक्के, तेजश रविंद्र गौतम ९०.६० टक्के, चेतन मोरेश्वर पटले ९०.४० टक्के, खुशी संतोश कावरे ९० टक्के, वंश प्रकाश बोरकर ९० टक्के, हर्षा नंदकिशोर दोनोडे ९० टक्के गुण मिळवून आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने परिसरात दर्जेदार व नावीन्यपूर्ण उपक्रमांनी यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी , संस्थासचिव माजी आमदार केशवराव मानकर,उपाधयक्ष प्रमोद कटकवार, संचालक हरिहर मानकर, ललीत मानकर, रमेश कावळे,उरमिलाताई कावळे, स्नेहा मानकर, प्राचार्य डि, एम, राऊत ,उपप्राचार्य डि, बी मेश्राम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. संचालन अनिल कटरे यांनी तर आभार वैष्णव सर यांनी मानले यावेळी प्रामुख्याने पालक वर्ग उपस्थित होते.