जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील भंडारा-बालाघाट राज्यमार्गावरील मौजा रनेरा दि. 29 मे ला सायं. 6 वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकची एसटी बसला धडक झाल्याने एसटी बसच्या मागील भागाचे काचा फुटल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, नागपूर एसटी आगाराचे बसचालक मिलन श्रीकृष्ण राऊत हे आपल्या ताब्यातील एसटी क्रमांक MH 40 Y 5474 ने नागपूर येथून तुमसर मार्गे मलाजखंड येथे जात असताना मौजा रनेरा येथील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 CM 2595 चा चालक रिशूल इंद्रपाल कोल्हे रा. नागपुर यांनी आपल्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणाने चालवून एसटी बसच्या मागच्या भागाला धडक दिली. यात एसटी बसचे काचा फुटल्याने बसचे खूप नुकसान झाले. यावेळी घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना मिळताच सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवा. गिरीश पडोळे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. दरम्यान एसटी बस चालकाच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवा. गिरीश पडोळे करीत आहेत.
भरधाव ट्रकची एसटी बसला धडक.. रनेरा येथील घटना…
1