अल्पवयीन कामगाराचा समावेश
आरोग्य सेवेचा अभाव
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :गजानन पोटदुखे
दिनांक :- 30 मे 2024
देवळी : देवळी शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या संगम स्टील इस्पात कंपनीच्या (SMW) परिसरात दोन कामगार युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे . मृतामध्ये एका अल्पवयीन कामगाराचा समावेश आहे. दोन्ही घटनेची देवळी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेली आहे . मृतामध्ये अमित प्रमोद मातकर वय (21)वर्ष रा. देवळी तर अल्पवयीन रोशन प्रकाश कामडी वय (17) वर्ष देवळी याचा समावेश आहे. दोघांनाही कंपनीच्या परिसरात काम करीत असताना भोवळ आली असता अमित ला सेवाग्रामला उपचार करण्याकरिता दाखल करण्यात आले. तर रोशनला सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. दोन्ही कामगाराचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा असा तर्कवितर्क लावण्यात येत आहे. दोन्ही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. दोषी कंपनी प्रशासनावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.या घटनेचा पुढील तपास देवळी पोलीस करित आहे.

